Sunday, May 19, 2024
Homeराज्यगुरुदेव सरोदे यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 'गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार'

गुरुदेव सरोदे यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ‘गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार’

मुंबई : बारामती एमआयडीसी मधील आय. एस. एम. टी. कंपनी मधील गुरुदेव शिवाजी सरोदे यांना महाराष्ट्र कामगार कल्याण  मंडळाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार २०१५ जाहीर झाला.

सरोदे हे सन १९९४ पासून आय. एस. एम. टी. कंपनी बारामती येथे कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. गेली अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत. कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कामाची दखल राज्य सरकारने घेतल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई येथे दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी पार पडला. कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू कामगार, कामगार विभाग प्रधान सचिव श्रीमती विनिता देव सिंगल (भाप्रसे), कामगार आयुक्त  महाराष्ट्र राज्य महेंद्र कल्याणकर (भाप्रसे), कल्याण आयुक्त विराज इळवे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

सन्मानपत्र, पदक ,स्मृतिचिन्ह आणि २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आयएसएमटी कंपनीतील सर्व कामगार अधिकारी तसेच बारामती परिसरातील विविध कामगार संघटना व कामगारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

गुरुदेव सरोदे यांचा मुलगा रत्नदिप सरोदे देखील समाज कार्यात अग्रेसर असून विद्यार्थी चळवळ, पर्यावरण चळवळ यामध्ये सक्रिय आहेत. रत्नदिप सरोदे सध्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे कोल्हापूर जिल्हा सचिव आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय