(आटपाडी /प्रतिनिधी):- कोरोनाच्या महासंकटात एक सामाजिक बांधिलकी या नात्याने सुभाष सातपुते अँड कंपनीचे चेअरमन सुभाष सातपुते व प्राजक्ता सातपुते यांनी आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवसानिमित पनवेल महानगरपालिकेला 1000 मास्क देऊन समाजासमोर आदर्श ठेवला आहे. समाजात पैसेवाले अनेक लोक आहेत, पण समाजाच्या अडचणीच्या काळात आपण दातृत्व दाखवून केलेल्या मदतीचा नक्की समाज आदर्श घेईल असे गौरव उदगार पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी माणदेशी युवा आदर्श आंतरराष्ट्रीय धावपटू उपजिल्हाधिकारी ललिता बाबर, मंत्रालयातील नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी संतोष ढेरे, तहसीलदार अनिकेत सोनवणे उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी वर्गाने सुभाष सातपुते यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करुन पुढील सामाजिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.