कळवण / सुशिल कुवर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दि.28 कळवण तालुका दौर्यावर येणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सकाळी दहा वाजता नांदुरी गडावर आगमन होणार आहे. त्यानंंतर ते नाकोडे येथे कळवण-सुरगाणा मतदारसंघातील विविध विकासकामांंचा शुभारंभ करणार आहेत.
तसेच शेतकरी, शेतमजूर, आदिवासी युवक मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते पुण्याला रवाना होणार आहेत. हा कार्यक्रम आ. नितीन पवार यांंनी आयोजित केला आहे.