Saturday, September 28, 2024
Homeताज्या बातम्याMaharashtra Board : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra Board : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra Board : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा राज्यभरात घेण्यात आल्या. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा झाल्या होत्या. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांना देखील आता दोन्ही परीक्षांच्या निकालाचे वेध लागले आहेत. आता या निकालांबाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागुन आहे. या परिक्षांचे निकाल लवकरच लागणार असून दहावी आणि बारावीच्या निकालांचे काम जवळपास पूर्ण झाल्याची माहिती आहे. येत्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात येईल अशी माहिती आहे.

बारावीचा निकाल जवळपास 21 किंवा 22 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली असून निकालाची तारीख येत्या दोन दिवसात जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती.

दहावीच्या परिक्षांचा निकाल देखील मे महिन्याच्या शेवटी जाहीर होऊ शकतो. दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान पार पडली होती. दहावीला 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.

Maharashtra Board असा पहा निकाल

mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी आपला दहावीचा निकाल पाहू शकतात. यंदा देखील बोर्डाकडून काॅपीमुख्य परीक्षा घेण्यासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. राज्यात कॉपीमुक्त दहावीची परीक्षा पार पडलीये.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !

25 दिवसांनंतर बेपत्ता अभिनेता घरी, अभिनेत्याने केला मोठा खुलासा

तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम

ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान

पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

मोठी बातमी : कन्हैया कुमार यांच्यावर प्रचारा दरम्यान हल्ला

शिरूर: स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा सर्व डाटा सुरक्षित –जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

IB : इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत मेगा भरती; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

संबंधित लेख

लोकप्रिय