जुन्नर (आनंद कांबळे) : श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भारत सरकारच्या “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” या उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
महाविद्यालय परिसरातील, निरूपयोगी गवत, झुडपे, प्लास्टिक कचरा, निरूपयोगी वस्तू गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली व महाविद्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान करत कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र कोरडे, डॉ. सुप्रिया काळे प्रा. विष्णू घोडे प्रा. जयश्री कणसे प्रा. मयूर चव्हाण यांनी केले.
या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या १२० स्वयंसेवकांनी भाग घेत विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी जुन्नर(Junnar)तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. संजय शिवाजीराव काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले.
Junnar
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले
गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज
जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा
पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ
उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ