Friday, May 17, 2024
Homeराज्यज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. ३० :- “ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार कलाक्षेत्रातील प्रदीर्घ दैदिप्यमान कारकिर्दीचा, मराठीतील सुपरस्टार अभिनेत्याचा, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा गौरव आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयानं, विनोदी भूमिकांनी त्यांनी रसिकांना मनमुराद हससवलं. मराठीसह हिन्दी कलाक्षेत्रं समृद्ध केलं. मराठीतील ‘सुपरस्टार’ अभिनेता म्हणून म्हणून नवोदित कलावंतांना प्रेरणा दिली. मार्गदर्शन केलं. वैयक्तिक जीवनातही आदर्श नैतिक मूल्यांची जपणूक केली. त्यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार एका महान कलावंताचा गौरव आहे. कोट्यवधी महाराष्ट्रवासियांनी एका अजातशत्रू व्यक्तिमत्वावर केलेल्या प्रेमाचं हे प्रतिक आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.

अशोक सराफ यांनी १९६० च्या उत्तरार्धात मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी रंगमंचावरील अभिनयामधूनच खऱ्या अर्थाने ओळख मिळवली. 
अशोक सराफ यांनी १९६९ पासून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपट केले, त्यापैकी १०० व्यावसायिक हिट ठरले. त्याने कॉमेडी सिनेमांमधून तुफान लोकप्रियता मिळवली. परंतु वयक्तिक जीवनात चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय