मावळ : मावळ खोऱ्यात पावसाने जोर धरला आहे. पनवेल, खोपोली, खंडाळा, लोणावळा परिसरात मागील तीन दिवसांपासून मान्सून स्थिरावला आहे. मावळच्या खांडी, नागाथली, वडेश्वर, कुसवली, सावळा ई कोकण सीमेला जवळ असलेल्या गावामध्ये मुसळधार पावसाने शेतकरी आनंदित झाला आहे.
पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी डॅम ओव्हरफ्लो झाले आहे.सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल झाल्याने या परिसरात पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे.
पावसाळी पर्यटनामुळे लोणावळा, कामशेत, कार्ला, भाजे, पवन मावळ, अंदर मावळ भागातील व्यापार उदीम व पर्यटनाशी संबंधित व्यवसाय तेजीत येतील, विशेषतः जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यात देशभरातून व राज्यातून तरुण, नोकरदार, विद्यार्थी माळ मध्ये येतात. यावर्षी उशिरा का होईना वरुण राजाने कृपादृष्टी केल्यामुळे लोणावळा मावळ परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
अलंकापुरीत आषाढी एकादशी दिनी लाखावर भाविकांची दर्शनास गर्दी
शहरालगत गहुंजे येथे क्रिकेट स्टेडियम असताना 400 कोटीचे मोशीत स्टेडियम ; उधळपट्टी कशासाठी ? नाना काटे यांचा सवाल
स्टॉर्म वॉटर जोडणी न केल्यामुळे चिखलीत (जाधववाडी) पाणी रस्त्यावर – स्थापत्य विभागाच्या गलथान कारभार – राजू भुजबळ