Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयलोक पर्यावरण मंच कोल्हापूर तर्फे शेतकरी आंदोलनासह 'ग्रेटा'ला पाठिंबा

लोक पर्यावरण मंच कोल्हापूर तर्फे शेतकरी आंदोलनासह ‘ग्रेटा’ला पाठिंबा

कोल्हापूर : पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मात्र एफआयआरला न घाबरता तिने पुन्हा एकदा ट्वीट केले असून तिने या ट्वीटद्वारे आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगितले आहे. कोणत्याही प्रकारची घृणा अथवा धमकी तिचा आवाज दाबू शकत नाही. 

शेतकरी आंदोलनाबाबत अमेरिकन पॉपस्टार रिहानाच्या ट्वीटनंतर ग्रेटा थनबर्गने ट्वीट केले होते की ती शेतकऱ्यांसोबत मजबुतीने उभी आहे. केंद्र सरकारच्या हातातील बाहुले बनलेल्या दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे, त्याचा लोक पर्यावरण मंच कोल्हापूरचे समन्वय रत्नदिप सरोदे, सहसमन्वयक नवनाथ मोरे यांनी निषेध केला आहे. तसेच ग्रेटाच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले आहे.

ग्रेटा एर्मन थुनबर्ग (जन्म – ३ जानेवारी २००३) ही ग्लोबल वार्मिंग आणि हवामानातील बदल थांबविण्यासाठी कार्यरत असणारी स्वीडिश राजकीय कार्यकर्ती आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये, स्वीडिश संसदेच्या इमारतीच्या बाहेर हवामानातील बदल थांबविण्यासाठी शाळेत संप सुरू करण्यासाठी ती एक पहिली व्यक्ती बनली. नोव्हेंबर २०१८ मध्ये ती टेडेक्सस्टॉकहोम येथे भाषण दिले. डिसेंबर २०१८ मध्ये तीने युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्सला संबोधित केले आणि जानेवारी २०१९ मध्ये डॅव्होस येथील जागतिक आर्थिक मंचाशी बोलण्यास आमंत्रित करण्यात आले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय