Saturday, May 4, 2024
Homeकृषीकांद्यावरील निर्यात बंदी उठवा - शेतकरी कामगार पक्ष

कांद्यावरील निर्यात बंदी उठवा – शेतकरी कामगार पक्ष

तहसिलदारांना कांदे देऊन मोदी सरकारचा केला निषेध

बीड : कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात यावी, या मागणीला घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसिलदारांना कांदे देऊन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधी अनेक निर्णय घेतलेले आहेत, शेतकरी कधी कोरड्या दुष्काळाने तर कधी ओल्या दुष्काळाने संकटात सापडलेला आहे, त्या मध्ये कोरोना सारख्या महामारीने शेतकऱ्यावर खूप मोठे आर्थिक संकट आलेले आहे, या तच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून एक प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे.

जागतिक बाजार पेठेत भारतीय कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असून त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरी चार पैसे पडतील, अशी आशा होती. मात्र केंद्र सरकारने निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारा आहे, 

या विरोधात शेकापचे भाई मोहन गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली केज, माजलगाव, बीड, धारूर, वडवणी, आंबेजोगाई, परळी, गेवराई, या तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन व एक किलो कांदे देऊन निषेध केला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय