प्रतिनिधी :- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी येत्या २२ तारखेपासून विधिमंडळाचे होणारे पावसाळी अधिवेशनाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. एकूणच परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला हे अधिवेशन घेता येणे कठीण आहे.
त्यामुळे २२ जूनला सुरु होणारे अधिवेशन हे ३ ऑगस्टला घेण्याचे ठरलेले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.