Monday, May 20, 2024
Homeआरोग्यकोरोनाराज्य सरकारचा इशारा..नाही तर पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात येईल.

राज्य सरकारचा इशारा..नाही तर पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात येईल.

(प्रतिनिधी):- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, सरकार अतिशय सावधतेने पावले टाकत आहे. जसं आपण लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने करत होतो, त्याचप्रमाणे शिथिलता आणताना टप्प्याटप्प्याने सगळं पूर्वपदावर आणावं लागेल. अजूनही संकट टळलेलं नाही, अजूनही लढा संपलेला नाही. पण कोरोनाबरोबर लढत असताना आपल्याला अर्थचक्र बंद करून चालणार नाही.

     जे सरकारने सांगितले की सकाळी ५ पासून संध्याकाळी ७ पर्यंत तुम्ही मैदाने किंवा इतर ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकता, व्यायामाला जाऊ शकता. पहिल्या दिवशी जी काही झुंबड उडाली, ती झुंबड बघितल्यानंतर थोडी घाबरुक वाटली. व्यायाम करायला आरोग्यासाठी सांगितले आहे, आरोग्य खराब करायला नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

     सरकार परिस्थितीचा अंदाज घेत आहे. जर वाटलं की ही शिथिलता जीवघेणी ठरू शकते तर नाईलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे, जनता सरकारचं ऐकत आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला गर्दी टाळण्याचे आवाहन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय