नाशिक : नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल मधील ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेची चौकशी महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली करावी, अशी मागणी डावी लोकशाही आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
नाशिकचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आक्सिजन गळतीमुळे 25 पेक्षा अधिक रुग्ण ना प्राण गमवावे लागले आहेत. याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीत माजी मनपा आयुक्त व तत्कालीन महसूल आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीत सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत. व सर्व स्थानिक आहेत.
निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी अनुभवी माजी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. तसेच समितीत माजी न्यायमूर्ती व पोलीस अधिकारी चा समावेश करून समितीची पुनर्गठन करून मृतांना न्याय द्यावा. अन्यथा ठेकेदारावर खापर फोडून मोकळे होतील. कोरोना योध्ये म्हणून कार्यरत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी दहशतीत, दबावात, पुरेसे कोरोना संरक्षण साहित्य नसतांना सेवा करीत आहेत. आवाज उठवल्यास खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. कोरोना झालेल्या मानधनी कर्मचारी व कर्मचाऱ्यांना कोरोंटाइन काळ पूर्ण न होता कामावर बोलवले जात आहे. त्यांना पगारी सुट्टी सुद्धा दिली जात नाही. इतर महाराष्ट्रातील मनपा कोरोना काळात मानधन वर कार्यरत असणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता, दिवाळी बोनस देत आहेत. मात्र नाशिक मनपा ने नाकारले आहे. याचीही चौकशी करण्यात यावी, तसेच कोरोना योध्दे म्हणून काम करणा-या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना कायम सेवेत वर्ग करा अशी मागणी डावी लोकशाही आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अँँड. तानाजी जायभावे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजू देसले, पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे शशिकांत उन्हवणे यांनी केली आहे.