Monday, May 20, 2024
HomeNewsमायक्रो फायनान्स कंपन्याबद्दल तक्रारी निराकरणासाठी टोल फ्रि क्रमांक सुरू; शासनाबरोबर सलोख्याने काम...

मायक्रो फायनान्स कंपन्याबद्दल तक्रारी निराकरणासाठी टोल फ्रि क्रमांक सुरू; शासनाबरोबर सलोख्याने काम करतील.

सांगली : कोविड-१९ मुळे बिघलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्या महाराष्ट्र शासनाबरोबर सलोख्याने काम करतील. मायक्रो फायनान्स कंपन्याबद्दल तक्रारीचे मराठीमध्ये निराकरण करण्यासाठी टोल फ्रि नंबर 18001021080 चालू केला असून याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे मायक्रो फायनान्स पश्चिम क्षेत्राचे सहायक उपाध्यक्ष देवेंद्र शहापुरकर यांनी कळविले आहे. 

 मायक्रो फायनान्स कंपन्यांचे सध्या जे कर्जदार आहेत त्यांच्या कर्जाचे हप्ते १ मार्च पासून ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत रिझर्व्ह बँकच्या आदेशाप्रमाणे पुढे ढकलण्यात आले आहेत. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा नाही अशांना ऑनलाईन किंवा रोखीने हप्ते भरण्यासाठी मायक्रो फायनान्स कंपनीचे फिल्डवर काम करणारे कर्मचारी किंवा संस्थेच्या कार्यालयात मदत करतील. तसेच मायक्रो फायनान्स कंपन्या इतर आर्थिक सेवा जसे, कॅशलेस मेडिक्लेम, अपघाती विमा आदी सेवा ज्या आजच्या काळात गरजेच्या आहेत त्या सुविधा पुरवित आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी आर्थिक अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटून माहिती देत आहेत. तसेच जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारचे, जिल्हा प्रशासनाचे तसेच आरबीआयच्या आदेशांचे तंतोतंत पालन करुन कार्य करीत आहेत. त्याचबरोबर कोविड-१९ च्या संदर्भात असलेल्या सर्व नियमांचे पालन करीत असल्याचे शहापुरकर यांनी कळविले आहे.

कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्याकडून त्यांच्या कर्जदार खातेदारांना अतिरिक्त कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. जेणेकरुन त्यांचे राहणीमान उंचावू शकेल, असे शहापुरकर यांनी कळविले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय