Krystyna Pyszkova : आज जगाला एक नवी मिस वर्ल्ड मिळाली आहे. ७१ वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा (Miss World 2024) अंतिम सोहळा ९ मार्च रोजी संपन्न झाला. हा सोहळा भारतात पार पडला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. हा किताब क्रिस्टिना पिस्कोव्हा ने (Krystyna Pyszkova) जिंकला. Krystyna Pyszkova Miss World 2024
मुंबईत झालेल्या ‘मिस वर्ल्ड २०२४’ चा किताब क्रिस्टिना पिस्कोव्हाने स्वत:च्या नावे केला. जवळपास २८ वर्षांनंतर मिस वर्ल्ड हा कार्यक्रम भारतात आयोजित करण्यात आला होता. या पुर्वी १९९६ मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात रंगली होती. २०२४ ची मिस वर्ल्ड स्पर्धा जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती.
सगळ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या मिस वर्ल्ड २०२४ च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. २०२४ चा मिस वर्ल्डचा ताज चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हाने पटकावला आहे. तर मिस लेबनॉन ही पहिली रनर अप ठरली आहे. माजी मिस वर्ल्ड मेगन यंगने नवीन मिस वर्ल्डचा मुकुट तिला परिधान केला. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या स्पर्धेत 112 देशांचे स्पर्धक सामील झाले होते. यावेळी सिनी शेट्टीने भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र ती टॉप 4 मध्ये आपलं स्थान कायम करू शकली नाही. या स्पर्धेतील टॉप 4 फायनलिस्टमध्ये लेबनॉन, त्रिनिदाद आणि टोबॅगो, बोत्सवाना आणि झेक प्रजासत्ताक यांचा समावेश होता.
मिस वर्ल्ड ठरलेल्या क्रिस्टिना पिस्कोव्हाला हिरे आणि मौल्यवान खड्यांनी जडलेला मौल्यवान मुकुट मिळाला आहे. मिस वर्ल्डच्या ताजची किंमत सुमारे 82 ते 83 लाख रुपये आहे. शिवाय तिला 10 कोटी रुपयांचं बक्षीसही मिळालं आहे. मिस वर्ल्डचा ताज जिंकल्यावर तिला हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणासोबतच संपूर्ण वर्षभर मोफत वर्ल्ड टूर मिळणार आहे.
‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन करण जोहर व ब्यूटी क्वीन मेगन यांग यांनी केलं. तसंच या सोहळ्यात शान, नेहा कक्कर, टोनी कक्कर परफॉर्म केले.
हे ही वाचा :
मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा
ब्रेकिंग : बंगळुरूमध्ये भीषण पाणी टंचाई
मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून
मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार