पिंपरी चिंचवड : रिक्षा चालकांचे नेते श्रीधर काळे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आमदार लक्ष्मण भाऊ जगताप , आमदार महेश लांडगे महापौर माई ढोरे आणि सत्तारूढ नेते नामदेव ढाके यांचे आभार व अभिनंदन व्यक्त केले.
क्रांती रिक्षा सेना गेली वर्षेभर आंदोलन, मोर्चा निदर्शने करत होते की हातावर पोट असणाऱ्या घटकांना कोरोना लॉकडाऊन दरम्यान अनुदान द्यावे. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रिक्षा चालक, कष्टकरी कामगार फेरीवाले यांना प्रत्येकी 3 हजार रुपये अनुदान जाहीर केले होते.
क्रांती रिक्षा सेनेचे अध्यक्ष श्रीधर काळे सेनेच्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव हाके यांचे समक्ष भेटून आभार मानले. तसेच चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे देखील फोन वरून आभार व्यक्त केले.
सत्तारूढ पक्षनेते नामदेव हाके यांनी सदर प्रक्रिया नागरी वस्ती खात्या अंतर्गत राबविणार असल्याचे सांगितले. श्रीधर काळे यांनी यावेळी या योजनानुसार ज्या रिक्षा चालकांना बॅच बिल्ला आहे, असे लाभार्थी करा अशी विनंती केली. त्यावर सकारात्मकता दर्शवली असल्याचेही काळे यांनी सांगितले.
यावेळी बाबा आखाडे, परमेश्वर तोरमल, दत्ता तोरमल, नितिन तोरमल, गणेश ढेरे, रामा हेडंवळे, कविता मैदाड, राम कुंभार हे उपस्थित होते.
लाभार्थ्यांना पुढील कागदपत्रे आवश्यक :
1. लायसन्स व बॅच
2. आधार कार्ड.
3. मतदान कार्ड.
4. बॅक पासबुक.