इचलकरंजी : आज इचलकरंजी नगरपालिकेने घरफाळ्यात दहा टक्के व घनकचरा व्यवस्थापन करामध्ये 100 टक्के वाढ करुन मालमत्ता धारकावर प्रचंड बोजा लादला आहे. त्या विरोधात पक्षाचे वतीने दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी याना निवेदन देऊन करवाढ मागे घेण्याची मागणी केली होती.
तसेच ताबडतोब कौन्सिल मिटींग घेऊन या घरफाळा वाढ आणि घनकचरा व्यवस्थापन अन्यायी करवाढ रद्द करा अशी मागणी करण्यात आली.
त्यानुसार नगरपालिकेने दिनांक 29 डिसेंबर 2021 रोजी कौन्सिल मिटींग आयोजित केली आहे. त्यासाठी आज नगरपालिकेतील विविध पक्षांच्या पक्षप्रतोद याना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देताना माकप जिल्हा सेक्रेटरी ए. बी. पाटील, इचलकरंजी शहर सेक्रेटरी भरमा कांबळे, सदा मलाबादे, धनाजी जाधव, सुभाष कांबळे, जीवन कोळी, गोपाळ पोला, आनंदराव चव्हाण, दत्ता रावळ उपस्थित होते.