Kolhapur : कोल्हापूर शहरालगत असलेल्या शिये गावात दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या पाच तासांत आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी घरातीलच निघाला असून, तो पीडित मुलीचा जवळचा नातेवाईक आहे. (Kolhapur)
पीडित कुटुंब मूळचे बिहारचे असून, ते गेल्या तीन वर्षांपासून शिरोली येथे राहत आहेत. शिये गावातील राम नगर परिसरात शिवानी कुमार ही दहा वर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबासोबत राहत होती. घटनेच्या दिवशी संध्याकाळी शिवानी आणि तिची पाच भावंडे घरी होती. याच वेळी आरोपीने तिला शेतामध्ये नारळ काढण्यासाठी बोलावले आणि पाच रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर ती त्याच्या सोबत शेताकडे गेली. (Kolhapur)
संध्याकाळी तिचे आई-वडील कामावरून घरी आल्यानंतर त्यांना मुलगी घरात कुठेच दिसली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला पण मुलगी सापडली नाही. अखेर सकाळी त्यांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि डॉग स्कॉडच्या मदतीने मुलीचा शोध घेतला. शेवटी घराच्या मागील उसाच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळला. वैद्यकीय पथक आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केला. फुटेजमध्ये शिवानी एका तरुणासोबत उसाच्या शेताकडे जाताना दिसली. त्यावरून पोलिसांनी तिला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला, जो तिच्या मामीचा भाऊ होता, ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. अत्याचार केल्यानंतर मुलगी रडायला लागली, आपलं बिंग फुटेल या भीतीने आरोपीने तिची हत्या केली.
गुरुवारी सकाळी मुलीचा मृतदेह शेतात आढळल्यानंतर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत आरोपीला अटक केली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे, आणि आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा :
MPSC : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश
मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू