Friday, May 10, 2024
Homeराजकारणमहाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकऱ्यांची अडवणूक थांबवून तात्काळ पीक कर्ज वाटप करा- भाई...

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकऱ्यांची अडवणूक थांबवून तात्काळ पीक कर्ज वाटप करा- भाई मोहन गुंड

(चिंचोली माळी /प्रतिनिधी) याविषयी सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्मचारी जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची थातुर मातुर कारणे शोधत अडवणूक करतात हे समजल्यानंतर शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबली पाहिजे या हेतूने बीड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी बँकेकडून कागदपत्राच्या नावाखाली होणारी शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी व लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना तगादा लावू नये. जेणेकरून शेतकऱ्यांचा व बँकेचा वेळ वाचला पाहिजे तसेच कर्जमाफी संदर्भात काही तांत्रिक अडचणी असतील तर शेतकऱ्यांना समजावून सांगा व कर्जमाफीचा लाभ प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला मिळाला पाहिजे.

शेतकऱ्याला सन्मानपूर्वक वागणूक द्या, शेतकरी वर्ग जवळपास अशिक्षीत असतो त्यांना सोशल डिस्टंसिंग चा वापर करायला सांगा. तसेच बँकेकडून नोड्युजसाठी पैशाची आकारणी करू नये,कोणाचीही ओरड येणार नाही याची काळजी घ्या कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका अशी बँकेचे व्यवस्थापक यांच्या सोबत चर्चा करुन, अशा आशयाचे निवेदन तहसील कार्यालय केज तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चिंचोली माळी येथे देण्यात आले.व कुठलीही अडचण असल्यास शेतकर्‍यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या पक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या निवेदनावर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड,

बाळासाहेब देशमुख, मंगेश देशमुख,अनिल गलांडे,अशोक रोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय