Friday, May 3, 2024
Homeजिल्हाशेतकऱ्यांना त्वरित अतिवृष्टी नुकसान भरपाई द्या, यासह कांदा अनुदान देण्याची किसान सभेची...

शेतकऱ्यांना त्वरित अतिवृष्टी नुकसान भरपाई द्या, यासह कांदा अनुदान देण्याची किसान सभेची मागणी

नाशिक : शेतकऱ्यांना त्वरित अतिवृष्टी नुकसान भरपाई द्या, कांदा ला 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या, वन जमिन धारकांना वाटप केलेल्या शेतकऱ्याना ७/१२ चा उतारा स्वतंत्र मिळावा यासह अन्य मागण्यांना घेऊन किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे प्रचंड शेतीचे नुकसान झाले आहे. त्वरित महाराष्ट्र शासनाने मदत करावी. पीक विमा कंपनी ने पंचनामा करून 25% रक्कम नुकसान भरपाई तात्काळ द्यावी. कांदा ला 500 रु प्रति किंट्टल अनुदान द्यावे. तसेच नाशिक जिल्ह्यात शासनामार्फत वन जमिनींचे पट्टे (सातबारा उतारे) मिळाले आहे. शासकीय योजनाचा लाभ मिळविण्यासाठी एकत्रीत दिलेल्या ७/१२ उताऱ्यामुळे खुप अडचणी येतात तो उतारा वैयक्तीक देण्यात यावा. तसेच संबंधीत अधिकाऱ्याना तशा सुचना देण्यात याव्यात.

तसेच वनजमीन धारकांना २० आर ३० आर ४० आर ८० आर असे क्षेत्र देण्यात आले आहे. हे अयोग्य आहे. आमचे आमच्या ताब्यात २ हेक्टर ते ४ हेक्टर क्षेत्र आहे ते संपूर्ण मोजून देण्यात यावे. तसेच वनअधिकारी व कर्मचारी हे स्थळ पाहणी न करता खोटा अहवाल देवुन वनजमीन धारकांना त्यांच्या हक्कापासुन वंचीत ठेवण्याचा प्रकार करत आहे. त्यांना स्थळ पाहणी करण्याच्या सुचना देण्यात याव्या आमच्या मागण्याकडे लक्ष देण्यात यावे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० ऑक्टोबर पासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष राजू देसले, जिल्हा अध्यक्ष देवीदास भोपळे, गोरख वाघ, बापु निकम, बाबुलाल घुगे, रंगनाथ कुमावत, दादा जाधव आदींसह उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय