Friday, November 22, 2024
Homeजिल्हाखेड सेझ पंधरा टक्के परतावा त्वरित द्यावे, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर आंदोलनाचा रिपाई...

खेड सेझ पंधरा टक्के परतावा त्वरित द्यावे, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर आंदोलनाचा रिपाई चा इशारा

खेड (पुणे) : खेड सेझ पंधरा टक्के परतावा त्वरित द्यावे, अशी मागणी रिपाई (आठवले) या पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास  मुख्यमंत्र्यांच्या निवाससमोर सेझ बाधित शेतकर्‍यांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालु्क्यातील सेझ बाधित शेतकऱ्यांचा पंधरा टक्के परताव्याचा प्रश्न गेली १२ वर्षा पेक्षा अधिक कालावधी झाला तरी प्रलंबित असून त्यांनी सेझ बाधित वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने करून व निवेदन देऊनही त्यांना न्याय मिळालेला नाही.

१५% परतावा धारक, ४५०भागधारकाची२५% एवढी  आगाऊ रक्कम जमीन संपादनाच्या वेळेस विकसीत भूखंडा साठी विकसन मूल्य म्हणून कपात करण्यात आली असून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पंधरा टक्के परतावा मिळालेला नाही. याबाबत सेझबाधित शेतकऱ्यांची शासनाच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्यामार्फत शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रश्न शासकीय पातळीवर सोडविला जावा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग मंत्री, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी, केईआयपीएल प्रतिनिधी, सेझ बाधित शेतकरी प्रतिनिधी, यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सेझ बाधित शेतकऱ्यांच्या १५%परतावा मिळावा यासाठी सेझबाधित शेतकऱ्यांनी रिपाईचे राज्य सचिव हरेश देखणे यांची भेट घेतली व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) या पक्षाच्या माध्यमातुन सेझबाधित शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून द्यावा यांसंबंधीचे निवेदन दिले असता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुख्यमत्री तसेच उद्योगमंत्री यांना निवेदन देण्यात आले. 

सेझबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असून त्यांना त्यांचा न्याय मिळवून देणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव हरेश देखणे यांनी सांगितले. 

तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांच्यापर्यंत हा प्रश्न पोचवला असून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांसमवेत या प्रश्नासंदर्भात बैठक घेण्याचे नियोजन आहे, असेही देखणे यांनी सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा पाठिंबा मिळवण्यासाठी सेझ बाधित शेतकऱ्यांच्या वतीने प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, उत्तम कान्हुरकर, मनिषा थिटे, प्रतीक दौंडकर, मनोहर गोरगल्ले, अंकुश गोरडे, रोहिदास दौंडकर यांनी प्रयत्न केले.


संबंधित लेख

लोकप्रिय