Saturday, May 18, 2024
Homeजिल्हापालघर येथे कातकरी सांस्कृतिक महोत्सव संपन्न, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा पुढाकार

पालघर येथे कातकरी सांस्कृतिक महोत्सव संपन्न, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा पुढाकार

पालघर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू जि पालघर यांच्या वतीने दि. १९ मे आणि २० मे रोजी आर्यन हायस्कूल पालघर येथे कातकरी महोत्सव २.० चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन पालघर जिल्ह्याचे विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी पालघर डॉ. माणिक गुरसळ,  सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू तथा प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल, पालघर तालुक्याचे तहसीलदार सुनिल शिंदे तसेच आदिम कातकरी जिल्हा व राज्यस्तरीय संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

कातकरी बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्याच्या मुख्य उद्देशासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी सर्वसाधारणपणे ९०० कातकरी बांधवानी सक्रिय सहभाग नोंदविला. पावसाळ्यापूर्वी स्थलांतर करून परत आले आहेत अशा कातकरी बांधवांचे सफेद टोप्यांचे वाटप करून स्वागत करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

या महोत्सवामध्ये एकूण ३२ स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉल मधून आदिवासींनी हस्तकलेतून तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. तसेच पालघर तहसील कार्यालयाच्या स्टॉल मधून रेशन कार्ड, आधार कार्ड, MREGS जॉब कार्ड संबधात माहिती देण्यात आली. महोत्सवामध्ये पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधून कातकरी बांधवाना महोत्सवामध्ये S.T. बसेसची सुविधा पुरविण्यात आली होती. शासनाच्या आदिवासी विकासाच्या योजनामुळे कातकरी बंधवांमध्ये राहणीमनातील सकारात्मक बदलाचे पथनटयाद्वारे उत्कृष्ट असे सादरीकरण करण्यात आले.

महोत्सवामध्ये पारंपरिक नृत्य स्पर्धा, पाककला स्पर्धा, क्रीडास्पर्धा, वेशभूषा स्पर्धा इ. आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक पालघर व रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या माध्यमातून विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुन्हा वापरण्यायोग्य सॅनिटरी नॅप्किनचे मोफत वाटप करण्यात आले.  प्रकल्प कार्यालयच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना व शाळाबाह्य मुलांना आश्रम शाळेमध्ये प्रवेश उपलब्ध करून देण्यात आले.

महागाई, बेरोजगारी व जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर शेतकरी कामगार संघटना आक्रमक, राज्यव्यापी आंदोलनाची हाक

हेरवाड गावचा नवा आदर्श; महाराष्ट्रात विधवा प्रथा बंद, शासन निर्णयाचे सर्वत्र स्वागत !

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कातकरी समाजातील १२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. सदर विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने करण्यात आला. शासन नियमाप्रमाणे नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या बँक खात्यात विहित केलेली रक्कम DBT द्वारे जमा करण्यात येणार आहे. रोशनी फाऊंडेशनच्या वतीने गृह उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. 

दोन दिवस संपन्न झालेल्या कार्यक्रम व स्पर्धा मधून विजेत्यांना मान्यवरकडून बक्षीस वितरण करण्यात आले. सदर महोत्सवामध्ये विविध विभागाकडील योजनांचा लाभ घेऊन कातकरी बांधवांनी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करावी जेणेकरून त्यांचे स्थलांतर थांबेल असे आवाहन डहाणूच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी करून दोन दिवसीय कातकरी महोत्सवाचा समारोप केला.

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा येथे विविध पदांसाठी भरती, 25 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय