Thursday, July 18, 2024
HomeNewsकंगना रणौतचा बिग बजेट 'धाकड' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला !

कंगना रणौतचा बिग बजेट ‘धाकड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला !

 

अभिनेत्री कंगना रणौतने दमदार अभिनय करत चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं स्थान बळकट केलं. तिने काही सुपरहिट चित्रपटही बॉलिवू़डला दिले. प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत ठामपणे मांडण्यातही ही अभिनेत्री सरस ठरली.

पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’ बाबत लवकरच दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

उत्तम भूमिकांमुळे नावारुपाला आलेली कंगना नवा कोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची गणितं काही वेगळी पाहायला मिळाली.

२० मे २०२२ला ‘धाकड’ देशभरात जवळपास २२०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाच्या बाबतीत कंगना फ्लॉप ठरली. पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. पहिल्या दिवशी या चित्रपटाची कमाई जवळपास १ कोटी २० लाख रुपये इतपत झाली. सकाळी ‘धाकड’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये फारशी गर्दी देखील नव्हती. कंगनाच्या इतर चित्रपटांच्या तुलनेमध्ये या चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन फारच कमी होतं.

या दिवसापासून होणार पेट्रोल डिझेल स्वस्त ; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय !

याउलट ‘धाकड’ बरोबरच प्रदर्शित झालेल्या कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या २’ चित्रपटाने बॉक्सऑफिसवर दमदार कमाई केली. या चित्रपटाची पहिल्याच दिवसाची कमाई १३ कोटी २५ लाख रुपये होती. म्हणजे कार्तिकच्या चित्रपटापुढे कंगना मात्र पुरती फ्लॉप ठरली असंच म्हणावं लागेल.

हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींना अनिसचा सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय