Tuesday, September 17, 2024
HomeNewsपावसाचा कहर : वीज पडून ३३ जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी शोक केला...

पावसाचा कहर : वीज पडून ३३ जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी शोक केला व्यक्त

पटणा : बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले असतानाच बिहारमध्ये ३३ जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

शुक्रवारी बिहारमधील अनेक भागांमध्ये वादळी वारे, मेघगर्जनेसहीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. काही तासांच्या या पावसामुळे मोठं नुकसान झालं असून वीज पडल्याने बिहारमधील १६ जिल्ह्यांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. भागलपूरमध्ये ७, मुझफ्फरपूरमध्ये ६, सारण आणि लखीसरायमध्ये ३, मुंगेर आणि समस्तीपूरमध्ये २ तर जेहानाबाद, खगरिया, नालंदा, पूर्णिया, बांका , बेगुसराय, अररिया, जमई, कटिहार आणि दरभंगामध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुःख व्यक्त केले आहे. 

महागाई, बेरोजगारी व जनतेच्या प्रश्नांवर शेतकरी कामगार संघटना आक्रमक, राज्यव्यापी आंदोलनाची हाक

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तसेच ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांनाही त्वरित नुकसान भरपाई दिली जावी, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच, खराब हवामानाच्या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा. खराब हवामानात सर्वांनी पूर्ण दक्षता घ्यावी, असे आवाहन नितीश कुमार यांनी जनतेला आवाहन केले आहे.

दरम्यान, या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईश्वर मृतांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तब्बल 105 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा येथे विविध पदांसाठी भरती, 25 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय