Thursday, September 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडKashinath Nakhate : ५० लाख फेरीवाल्यांच्या हक्कासाठी राज्यभर लढाई

Kashinath Nakhate : ५० लाख फेरीवाल्यांच्या हक्कासाठी राज्यभर लढाई

मुंबई येथे पत्रकार परिषदेत संयुक्त संघटनांचा निश्चय (Kashinath Nakhate)

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये फेरीवाला कायदा असूनही राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे अंमलबजावणी होत नाही, सरकार मोठ मोठ्या धनिकांना पाठिंबा देत आहे मात्र श्रमिक आणि गोरगरीब फेरीवाल्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करत नाही म्हणून येत्या १३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच राज्यभर विविध महापालिका क्षेत्रात आंदोलन करण्याचां निर्धार आज मुंबईतील पत्रकार परिषदेत घेण्यात आला.

मुंबई येथे नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र होकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, जनवादी होकर्स सभा, शहीद भगतसिंगयुनियन, जय हिंदुस्थान संयुक्त संघटनांकडून मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, के नारायणन, विनिता बाळेकुंद्री अखिलेश गौड, बबन कांबळे, रामा बिराजदार, इरफान चौधरी, शैलेंद्र कांबळे आधी पदाधिकारी उपस्थित होते. (Kashinath Nakhate)

यावेळी नखाते म्हणाले की माननीय उच्च न्यायालयाचा आम्हाला आदर आहे मात्र न्यायालय आमची बाजू आणि कायदा समजून घ्यायला हवा ,उच्च न्यायालयाच्या आडून कुणीतरी संस्था न्यायालयामध्ये मधून फेरीवाल्यांच्या विरोधात निर्णय आणण्याचा प्रकार घडत आहे का ? अशी शंका वारंवार आता येत आहे. राज्य सरकार गेल्या दहा वर्षांमध्ये योजना बनवण्यात असफल ठरलेल असून राज्यातील ५० लाख फेरीवाल्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. अनेक महानगरपालिका मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झालेले नाही ते सर्वेक्षण त्वरित करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे मुंबईमध्ये गेल्या एक महिन्यापासून फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद असून त्यांना उपाशी मारण्याचा प्रकार सरकार आणि मुंबई मनपा कडून होत आहे.

महाराष्ट्र सरकार व मुंबई महानगरपालिकेकडून अन्याय दूर करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करू .विनिता म्हणाल्या राज्य सरकारकडून केवळ घोषणाच केल्या जात आहेत मात्र विविध महानगरपालिका मधील पथ विक्रेत्याकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले असून आगामी विधानसभा निवडणुकांबाबत भूमिका याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.अखिलेश गौड यांनी मुंबईतील फेरीवाल्यांचे जगणे मुश्कील होत आहे आता स्वस्थ बसणार नाही आम्ही आता संघर्ष करणार असल्याची माहिती काशिनाथ नखाते यांनी दिली.

आभार किरण साडेकर यांनी मानले

संबंधित लेख

लोकप्रिय