Sunday, May 19, 2024
Homeबॉलिवूडकंगना रानावत हिने केली मुंबईची अपमानास्पद तुलना; राज्यातील वातावरण तापले

कंगना रानावत हिने केली मुंबईची अपमानास्पद तुलना; राज्यातील वातावरण तापले

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरच्या माध्यमातून नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. मात्र, कंगना राणौत हिने नुकतंच ‘देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत’ केल्यामुळे आता कंगणावर सोशल मीडियावर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली आहे.

दरम्यान, यानंतर आता कंगनानं ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे. कंगना म्हणाली कि, ‘मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या ९ सप्टेंबर रोजी येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन.’ 

कंगना रानावत हिने ट्विट केले आहे की, “कंगनाला मुंबईतच राहण्याचा हक्क नाही, आम्ही खात्री करुन घेऊ की ती मुंबईत येऊ शकत नाही, आम्ही पालघर साधूंना ज्या प्रकारे लंके केले त्याप्रमाणे आम्ही तिला दगड आणि रॉडनी मारू एका दिवसात आपण स्वत: पीओके ते तालिबानात कसे बढती घेतली हे कौतुकास्पद आहे.” असे म्हंटले आहे, या नंतर मुंबईसह राज्यभरातील संतापाची लाट उसळली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की, “मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही.”

तर “ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगणा राणावतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्या मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आणि महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान आहे.” असे ट्विट कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

तर शिवसेनचे आमदार प्रताप सरनाईक यांंनी मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणारा कंगनावर देशद्रोही म्हणून खटला दाखल करणार असल्याचे ट्विट केले आहे. ट्विट पुढीलप्रमाणे, “कंगनाला खासदार संजय राऊत नी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना  पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.”

“आमच्या देशाची काश्मिर शान आहे, महाराष्ट्र आमचा अभिमान आहे, मुंबई आमची जान आहे, जो आमच्या शानचा, अभिमानाचा आणि जान चा अपमान करेल त्याने…..” असे ट्विट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय