Tuesday, May 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडही आहे मराठमोळी मनिमाऊ पाहताक्षणी पडाल प्रेमात!

ही आहे मराठमोळी मनिमाऊ पाहताक्षणी पडाल प्रेमात!

मांजर आवडते का तुम्हाला? आवडतं असेल तर हा व्हिडीओ तुम्हाला नक्की आवडेल. सोशल मीडियावर एका गोंडस मांजरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. तुम्हाला ऐकून थोडे धक्का बसेल पण व्हायरल व्हिडीओतील मनीमाऊने चक्क मराठमोळा साज शृंगार केला आहे.होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. विशेष म्हणजे हा साज शृंगार अगदी शोभून दिसत आहे. तुम्ही जर मांजरप्रेमी असाल तर व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला या मांजराचे लाड करण्याचा मोह होईल.



प्राणी प्रेमी लोक अनेकदा मांजर-कुत्रा असे प्राणी पाळतात आणि त्यांना भरभरून प्रेम देतात. काही लोक त्यांना घरातील व्यक्ती असल्यासारखे प्रेम करतात. अनेकदा आपल्या पाळीव प्राण्यांना फॅन्सी कपडे घालतात किंवा गॉगल घालतात. पण आता लोक मांजरींना महाराष्ट्रीयन दागिणे आणि कपडे घालत आहे.

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, पांढरी शुभ्र, गोड मांजर दिसत आहे. या मांजरीच्या गळ्यात पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिणे घातले आहेत. तिच्या गळ्यात ठुशी घातलेली आहे. मांजरीच्या कपाळी चंद्रकोर असलेली टिकली लावली आहे. तिच्या नाकावर चमकीसाखी दिसणारी खड्याची टिकली लावली आहे. तसेच मांजरीच्या अंगावर पारंपारिक महाराष्ट्रीयन साडी सारखे दिसणारे कापड टाकले आहे. मनीमाऊचा मराठमोळा साज शृंगार फार गोड दिसत आहे. पण तिचे निळेशार डोळ्यांमध्ये पाहिले तर कोणीही तिच्या प्रेमात पडेल. मनीमाऊचे डोळे पाहून तुम्हीही म्हणाल ‘गं तुझं टपोरं डोलं जसं कोळयाच जालं…’, व्हिडीओला शेअर करताना हे गाणं जोडले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय