जुन्नर / शिवाजी लोखंडे : आंबोली ता. जुन्नर येथील यशवंत मोहरे हा इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस ( आयईएस ) परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. त्याने जुन्नर च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
त्याची केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प विभागात मिनिस्टर ऑफ फायनान्स असिस्टंट डायरेक्टर वर्ग एक पदावर नियुक्ती झाली. त्याने राज्यात आदिवासी विभागात अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रथमच आयईएस अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला आहे.
दिवंगत वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी वैभवला आईने प्रोत्साहन केले. तालुक्यात सर्वत्र वैभववर कौतुक होत आहे.