Wednesday, September 18, 2024
Homeजुन्नरजुन्नर : माणकेश्वर येथे महिला मिळाव्यात कौटुंबिक सल्ला केंद्राची स्थापना

जुन्नर : माणकेश्वर येथे महिला मिळाव्यात कौटुंबिक सल्ला केंद्राची स्थापना

जुन्नर : रविवार दि.12 डिसेंबर 2021 रोजी माणकेश्वर ता.जुन्नर जि. पुणे येथे महिला मेळावा संपन्न झाला.

ग्रामीण आदिवासी मुली आणि महिला यांच्यावर होणारे कौटुंबिक आणि सामाजिक अन्याय, अत्याचार यांच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्याचबरोबर बालविवाह, बालमजुरी, महिला हक्क आणि अधिकार, बेरोजगारी, आरोग्य व शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांच्या अंतर्गत कौटुंबिक सल्ला केंद्र स्थापन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या विविध समस्या सोडविण्यात येणार आहेत. 

सदर मेळाव्यास अखिल भारतीय जनावादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुभद्राताई खिलारी, उपाध्यक्षा व महिला घरकामगार संघटनेच्या अध्यक्षा सरस्वती भांदिर्गे, जनवादी महिला संघटनेच्या पुणे जिल्हा सचिव हिराबाई घोंगे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

कौटुंबिक सल्ला केंद्राची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : 

● अध्यक्ष : कल्पना लहू कोरडे

● उपाध्यक्ष- तुळसाबाई ज्ञानेश्वर उतळे

● सचिव – माधुरी सतिश कोरडे

● सहसचिव – शेवंताबाई काशिनाथ बांबळे

● खजिनदार – नंदाबाई पांडुरंग बांबळे

तसेच इतर सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी केळी, माणकेश्वर आणि चावंड या गावातील महिला उपस्थित होत्या.


संबंधित लेख

लोकप्रिय