अहमदनगर : बिरसा क्रांती दलाच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका अध्यक्षपदी प्रा. लहानु वायळ यांची निवड आज १० डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आली.
बिरसा क्रांती दलाच्या झेंड्याखाली आदिवासी समाजातील ४५ जमातीतील परिवर्तनशिल युवक जागरूक शिक्षित कर्मचारी यांना संघटीत करण्याचा निर्णय बिरसा क्रांती दलाने घेतला आहे. समाजातील अशा घटकांना संघटीत करण्याची धारणा स्वावलंबनाचा स्विकार हि सर्वश्रेष्ठ गोष्ट असते. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी, अस्तित्व, अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त, शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.
यावेळी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी राज्य उपाध्यक्ष, डी बी अंबुरे, राज्य सचिव चिंधू आढळ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रंगराव काळे, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे, कार्याध्यक्ष हरिभाऊ तळपे, पुणे जिल्हा सचिव शशिकांत आढारी, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संतोष बोटे, उपाध्यक्ष ह. भ.प .अनिल महाराज तळपे, सचिन धराडे, अकोले तालुका अध्यक्ष विजय मेंगाळ, संगमनेर तालुका अध्यक्ष मंगेश धराडे, उपाध्यक्ष लहुजी मेंगाळ, संदिप उघडे, महासचिव जालिंदर सुपे, सचिव शिवाजी वाघ , विकास उघडे, प्रसिद्धी प्रमुख भास्कर उघडे कोषाध्यक्ष सचिन गिऱ्हे, सल्लागार अंकुश फोडसे, संघटक अजय उघडे, नाथा उघडे प्रविण पोटकुले, दिनकर भारमळ, अरुण गावंडे अजय धिंदळे, सदस्य राजेंद्र मेंगाळ, जयेश लांडे, विलास कडाळे, रामभाऊ अस्वले किसन मेंगाळ सचिन उघडे, देवीदास धिंदळे, नवनाथ उघडे इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.