Friday, May 17, 2024
Homeजुन्नरजुन्नर : अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे पंचायत समिती कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन, सरकारला दिला...

जुन्नर : अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे पंचायत समिती कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन, सरकारला दिला इशारा

जुन्नर / नवनाथ मोरे : आज दि.१० जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र सर्वच तालुका पंचायत समित्यांवर थाळीनंद आंदोलन करत आहे म्हणून जुन्नर तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर सिटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली थाळीनाद आंदोलन केले.

यानंतर अनेक महिलांनी जोरदार घोषणा देत, गाणी गात सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.  यानंतर किसान सभेच्या वतीने गणपत घोडे यांनी मार्गदर्शन केले. त्याबरोबर एस एफ आय विद्यार्थी संघटनेचे राजेंद्र शेळके यांनी मार्गदर्शन केले. यानंतर लक्ष्मण जोशी सल्लागार, शुभांगी शेटे यांनी मागण्या बाबत सरकारने काहीही करताना दिसत नाही, त्यामुळे जोरदार टीका केली.

यामध्ये महिला बाल विकास विभागाने अनेक सेविका मदतनीस यांना कामावरून काढून टाकण्यासाठी नोटीस दिल्या आहेत. त्या नोटीसला उत्तरे महिलांनी दिले आहेत.

सुप्रीम कोर्ट यांनी अंगणवाडी कर्मचारी बाजूने दिलेेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्या, अंगणवाडी सेविका, मदतनीसांना अनुक्रमे २६,०००, १८००० हजार वेतन द्या, अंगणवाडी पोषण आहार दर्जेदार द्या, अमृता आहार दर्जेदार मिळाला पाहिजे आदी ११ मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत.

राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवल्या नाहीत तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी सचिव मनीषा भोर, सुशीला तांबे, रुक्मिणी लांडे, जयश्री भागवत, तुळाबाई घोडे, सीमा कुटे, गीता शेटे, मीना मस्करे, सविता ताजनेे, मीरा आरोटे, साधना मोजाड  मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय