Friday, October 18, 2024
Homeजुन्नरतालुकास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेत-इनामवाडी प्राथ.शाळेस तृतीय क्रमांक

तालुकास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेत-इनामवाडी प्राथ.शाळेस तृतीय क्रमांक

जुन्नर /आनंद कांबळे : जिल्हा नियोजन समिती व जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे मार्फत जागतिक वारसा नामांकन किल्ले बनवा या तालुका स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे तालुका अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे तर सचिव तथा गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे यांनी काम पाहिले. त्याचे मार्गदर्शनाखाली जि.प.प्राथ. शाळा इनामवाडी येथे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या सहकार्यातून “किल्ले शिवनेरीची” भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आली होती. किल्ल्यावरील प्रत्येक महत्वपूर्ण स्थान कल्पकतेने दाखविण्यात आले होते. ह्या स्पर्धेमुळे किल्ले शिवनेरी प्रतिकृती मनाला मोहून टाकणारी व शिवरायांची स्मृतिंना उजाळा देणा-या परंपरेची जनजागृती, इतिहासाचा वारसा जागवणारी ठरली.(Junnar)

या स्पर्धेत तालुक्यातील 34 शाळांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे 3 मिनिटांचे सादरीकरण प्रत्येक शाळेने केले. स्पर्धेचे परिक्षण तहसीलदार सुनिल शेळके, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, नायब तहसीलदार सचिन मुंढे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदिप भोळे व समन्वयक म्हणून यश मस्करे यांनी काम पाहिले.

या मूल्यामापनाध्ये जि.प.प्राथ.शाळा इनामवाडीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून यासाठी गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे, विस्तार अधिकारी संचिता अभंग व केंद्रप्रमुख बाळासाहेब मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक शांताराम मोधे, पदवीधर शिक्षिका सुमन उतळे, उपशिक्षक अनामिका मोढवे, सविता उगले व निवृत्ती दिवटे यांनी वरिष्ठांकडून मिळालेल्या मार्गदर्शन व सूचना अंमलात आणल्या. त्याचप्रमाणे सरपंच दत्तात्रय ताजणे, उपसरपंच रमेश काळे, शा.व्य.समितीचे अध्यक्ष रामदास काळे, पालक गोविंद भालेकर, माजी विद्यार्थी शुभम भालेकर,गणेश भालेकर, रोशन भालेकर सागर पारधी, अभिषेक भालेकर, साहिल भालेकर, नितीन भालेकर, महेश भालेकर, आकांक्षा व अंकिता भालेकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिवाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व कुसुर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजूशेठ भगत, माजी सरपंच सदाशिव ताजणे, किल्ले शिवनेरी झांज पथकाचे अध्यक्ष अनिल मोधे यांचे सहकार्याने ही प्रतिकृती बनविण्यात आली होती.

तालुकास्तरीय मूल्यमापन स्पर्धेत शाळेस तृतीय क्रमांक मिळाला असल्याचे मत मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले.

Junnar

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त

मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित

सर्वात मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

संबंधित लेख

लोकप्रिय