Thursday, July 18, 2024
Homeजिल्हाजुन्नर : 9 डिसेंबर रोजी आदिवासींची विशेष भरती त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी...

जुन्नर : 9 डिसेंबर रोजी आदिवासींची विशेष भरती त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी निघणार संघर्ष मोर्चा

जुन्नर : आदिवासींची विशेष भरती त्वरित चालू करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन आदिवासी विद्यार्थी स्पर्धा परिक्षा संघर्ष समिती, पुणे च्या वतीने दिनांक ९ डिसेंबर २०२१ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय ते तहसील कार्यालय जुन्नर असा मोर्चा काढण्यात येणार आहे.

अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणारा २८ ऑक्टोबर २०१९ चा शासन निर्णय रद्द करा, आदिवासींच्या विशेष भरती बाबत कालबद्ध शासन निर्णय जाहीर करा, १२५०० बोगसांची अधिसंख्य ठरविण्यात आलेली पदे तत्काळ रिक्त करा, बोगस आदिवासींची रिक्त केलेली २९८२ पदे भरण्यासाठी त्वरित जाहिरात काढा, केंद्र व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय / निमशासकीय नोकऱ्यामधील अधिसंख्य पदे जाहीर करा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 

मोर्चाबाबतचे निवेदन जुन्नर पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय यांना देण्यात आल्याची माहिती संजय साबळे, राजेंद्र शेळके, लक्ष्मण जोशी यांनी दिली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय