Saturday, April 27, 2024
Homeनोकरीपुणे : आदिवासी भागातील सचिन लांडे याची UPSC परिक्षेत गगनभरारी

पुणे : आदिवासी भागातील सचिन लांडे याची UPSC परिक्षेत गगनभरारी

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील शिरोली (पूर) येथील सचिन देवराम लांडे याची यूपीएससी परीक्षेत गगन भरारी घेतली आहे. AIR (All India Rank) 566 मिळवत उत्तुंग यशाला गवसणी घातली आहे.

सध्या वाई येथे वास्तव्यास असणाऱ्या सचिन देवराम लांडे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. त्यांने (All India Rank) AIR 566 मिळाली असून भविष्यात ते आयएएस किंवा आयपीएस पदासाठी दावेदार असतील. यापूर्वी एमपीएससीमार्फत सचिनची निवड नायब तहसीलदार पदी झाली होती.

हेही वाचा ! ब्रेकींग : राज्यातल्या शाळा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची प्रस्तावास मान्यता

मागील अनेक वर्षापासून घेत असलेल्या मेहनतीच्या जोरावर त्याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. सचिनच्या या यशात त्याचे आई-वडील यांचे मोलाचे योगदान आहे. सचिनचे वडील देवराम लांडे हे शासकीय मुद्रणालय वाई येथे कार्यरत आहेत. त्याच्या या यशामुळे जुन्नर तालुक्यात आनंद व्यक्त केला जात असून सचिनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हेही वाचा ! पुणे : सर्पदंश झालेल्या आदिवासी महिलेस उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू, डॉक्टरांवर कारवाई करण्याची किसान सभेची मागणी


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय