Friday, March 29, 2024
Homeजिल्हा27 सप्टेंबर : 'भारत बंद'साठी शहरात महाविकास आघाडी आणि कामगार नेत्यांच्या चौकसभा...

27 सप्टेंबर : ‘भारत बंद’साठी शहरात महाविकास आघाडी आणि कामगार नेत्यांच्या चौकसभा !

पिंपरी चिंचवड : कामगार संघटना संयुक्त कृती समिती, संयुक्त किसान मोर्चा, महाविकास आघाडी, जन आंदोलन समितीच्या च्या वतीने भारत बंद साठी प्रचार सभा सुरू झाल्या आहेत.

आज (दि.24) लोकमान्य टिळक पुतळा (निगडी) विठ्ठल मंदिर चौक आकुर्डी, दत्तमंदिर चौक (मोहननगर) येथे आज चौक सभांना सुरुवात झाली.

ब्रेकींग : राज्यातल्या शाळा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची प्रस्तावास मान्यता

उद्या (दि.25) रामकृष्ण मोरे मंगल कार्यालय (सांगवी) कुणाल हॉटेल चौक (काळेवाडी) आर्य मेडिकल, दत्त मंदिर (वाकड) तर  26 सप्टेंबर रोथी वाल्हेकरवाडी चौक, चाफेकर चौक (चिंचवडगाव), शगुन चौक (पिंपरी) येथे येथे सभा होणार आहे. तर दि.27 रोजी सकाळी 9 वा कामगार शेतकरी मोर्चाने आंबेडकर चौक, पिंपरी येथे जमणार आहे.

संपूर्ण देशव्यापी आंदोलन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, इंदिरा काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष,प्रहार जनशक्ती पक्ष तसेच इंटक, आयटक, सिटू, टीयुसीसी, भारतीय कामगार सेना, श्रमिक एकता महासंघ, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, राष्ट्रवादी कामगार सेल, कष्टकरी संघर्ष महासंघ, बीएसएनएल, बँक एम्प्लॉईज फेडरेशन, ग्रीव्ह्ज कॉटन अलाईड एम्प्लॉईज युनियन, पूना एम्प्लॉईज युनियन, महाराष्ट्र मजदूर संघटना, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया, अपना वतन संघटना, मानवाधिकार आयोग, संभाजी ब्रिगेड, छावा युवा संघटना, घर कामगार संघटना, कात्रज दूध उत्पादक संघटना, संरक्षण, पोस्ट, नर्सेस, अंगणवाडी, बालवाडी सह रिक्षा, पथविक्रेते यांच्या संघटनांच्या वतीने या सभा आयोजित केल्या जात आहेत.

हेही वाचा ! पिंपरी चिंचवड : एचएसबीसी आणि विप्ला फाउंडेशनच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

कैलास कदम, संजोग वाघेरे, ऍड.सचिन भोसले, किशोर ढोकले, दिलीप पवार, मानव कांबळे, मारुती भापकर, इरफान सय्यद, काशीनाथ नखाते, वसंत पवार, अनिल रोहम, गणेश दराडे, अपर्णा दराडे, राजश्री शिरवळकर, सचिन देसाई, फातिमा अन्सारी, सतीश काळे, धनाजी येळकर आदी नेत्यांची भाषणे चौक सभेत आयोजित करण्यात आली आहेत.

हेही वाचा ! पुणे : सर्पदंश झालेल्या आदिवासी महिलेस उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू, डॉक्टरांवर कारवाई करण्याची किसान सभेची मागणी


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय