Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणजुन्नर : सहायक पोलीस निरीक्षकाचे आदर्शवत कार्य; पाणी टंचाई गावांसाठी स्वखर्चातून पाण्याचा...

जुन्नर : सहायक पोलीस निरीक्षकाचे आदर्शवत कार्य; पाणी टंचाई गावांसाठी स्वखर्चातून पाण्याचा टँकर सुरू

जुन्नर : ओतूर, (ता. जुन्नर) येथील पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी कोपरे, मांडवे, मुथाळणे परीसरातील नागरीकांना ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून स्वखर्चाने पाण्याचा टँकर सुरू करून समाजातील एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

या परीसरात ऐन उन्हाळ्यात नेहमीच पाणी टंचाई निर्माण होते. गढूळ, झऱ्याचे आणि शिवकालीन टाकीतील हिरळे झालेले पाणी नागरिक वापरतात. यामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागातील पाणी प्रश्न वर्षनुवर्षे आ-वासून उभा आहे. शासनाकडून या भागात प्रत्येक वर्षीप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पुरवला जातो. मात्र, लोकसंख्या मोठी असल्याने ही सेवा तोकडी पडते.

मात्र, जानेवारीतच ओतूर पोलिस ठाण्याचा प्रभार स्विकारलेले प्रभारी अधिकारी सचिन कांडगे यांना या भागातील भेटीदरम्यान पाणीटंचाईची समस्या दिसून आली. तसेच प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या यामुळे त्यांनी एक ‘माणूसकीचा हात’ देत या भागात स्वखर्चाने पिण्याचा पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला.

तसेच प्रथम स्वतः टँकरबरोबर जाऊन नागरीकांना पाणी वाटप ही केले. तसेच या परीसरातील पोलीस पाटलाशी संपर्क व समन्वय साधून ज्या वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच शासकीय टँकर न आल्याने झालेली पाणी टंचाई अश्या वाड्या वस्त्यांवर ते पिण्याच्या पाण्याचा टँकर पाठवतात. आतापर्यंत त्यांनी तीन पाण्याचे टँकर या भागात पाठवले असून , पोलीस पाटलांकडून माहिती घेऊन या पुढेही पिण्याच्या पाण्याचे टँकर या भागात उपलब्ध करून देणार आहेत.

शासनाबरोबर आर्थिक सधन व्यक्तीनी व स्वयंसेवी संस्थानीही या व इतर भागात जेथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तेथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरूच करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी केले आहे.

हे ही वाचा :

श्रीक्षेत्र ओझर येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन

विषमुक्त शेती काळाची गरज – कृषिरत्न अनिल मेहेर

गोद्रे येथे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पाणंद रस्त्याच्या कामास सुरुवात

जुन्नर : बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी एकास अटक तर २० जणांवर गुन्हा दाखल

जुन्नरच्या पेशवेकालीन शाहीर समाधी मंदिरातील “पदचिन्ह” दुर्लक्षित

जुन्नर : बेलसर ते भिवाडे दरम्यानचा रस्ता खड्डेमय; धुळ व खडीचा वाहनचालकांना त्रास

कादरीया वेलफेअर सोसायटी तर्फे सामुदायिक विवाह संपन्न

धक्कादायक : शौचालयाचा टँक साफ करताना एकाच घरातील पाच कामगारांचा गुदमुरून मृत्यू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय