जुन्नर : जुन्नर तालुक्यातील धोलवड या गावातील युवक कै.प्रकाश बबन नलावडे (वय 38) यांच्या दशक्रियाच्या निमित्ताने आज (दि.11) हृदयरोग जनजागृती मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते.
दहा दिवसांपूर्वी नलावडे परिवारातील युवक प्रकाश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आणि नलावडे परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला. यातून सावरत समाजाला प्रबोधन करण्यासाठी जे दुःख आपल्या वाट्याला आलेले आहे हे इतर कोणत्याही कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी (हार्ट अटॅक) हृदयरोग विषयावरती जनजागृती करण्याचे त्यांनी ठरवले.
नारायणगाव येथील विघ्नहर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. आशुतोष बोळीज व डॉ. दयानंद गायकवाड यांनी उपस्थितांना हृदयरोग म्हणजे काय, त्याची लक्षणे, त्यावरील उपाययोजना व आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे याविषयीं मार्गदर्शन केले. दशक्रिया विधीनंतर या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले. आरोग्यवर्धक उपयुक्त माहिती पहिल्यांदाच ग्रामीण भागातील महिलांना ऐकावयास मिळाल्यामुळे त्यांना फार समाधान लाभले, व समाजात जनजागृती झाली.
हे ही वाचा :
अमित शहांच्या भाषणातील २० मिनिटात ७ मिनिटे उद्धव ठाकरेंवर, मातोश्रीचा धसका कायम; राऊत यांची टीका
ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी
बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन
नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल रमेश बैस
आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, अशा असणार सोयी-सुविधा
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती
‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता’, चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी नाही…