Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणजुन्नर : लग्नाच्या वरातीत डी. जे. लावून मिरवणूक गुन्हा दाखल

जुन्नर : लग्नाच्या वरातीत डी. जे. लावून मिरवणूक गुन्हा दाखल

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर तालुक्यातील केवाडी येथे लग्नाची वरात धुमधडाक्यात केल्या प्रकरणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिवसेनेचे विद्यमान सदस्य देवराम लांडे गुन्हा दाखल झाला आहे.

हे पण वाचा ! जुन्नर : देवराम लांडे यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल

याबाबतची हकिकत अशी की, शनिवारी रात्री देवराम लांडे यांनी केवाडी गावात आपल्या दोन्ही मुलाची लग्न वरात काढली होती. याकरिता जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेशलागू असताना वत्यांना डी.जे. न लावणे बाबत नोटिस देवून सुद्धा केवाडी गावात सुमारे ७०० लोक जमा करुन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन डी. जे. सिस्टीम विना परवाना चालू ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवि १८८, २६९, २७९ तसेच पोलिस अधिनियम ३७(१)(३),१३५, १३१, ३३ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

हे पण वाचा ! जुन्नर : देवळे येथे मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी किसान सभेचा महिला बचतगटांशी संवाद !

याबाबत पोलिस अंमलदार गणेश जोरी यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पाटील करत आहेत.

हे वाचा ! जुन्नर : खटकाळे – खैरे गावात बसवले हायमॅक्स दिवे


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय