Thursday, April 25, 2024
Homeजिल्हादलित ग्रामीण कथेतील गावगाडा हा ग्रंथ मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरेल -...

दलित ग्रामीण कथेतील गावगाडा हा ग्रंथ मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरेल – डॉ. सतीश कामत

कोल्हापूर : निर्मिती प्रकाशन कोल्हापूर प्रकाशित, ज्येष्ठ लेखिका व समीक्षक डॉ. शीला रत्नाकर यांच्या “दलित ग्रामीण कथेतील गावगाडा” या ग्रंथावर परिसंवाद संपन्न झाला.

यानिमित्ताने हा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरेल अशी भूमिका डॉ. सतीश कामत यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना व्यक्त केली. भारतीय समाजमाणसाचा, समाजरचनेचा विचार करताना गावगाड्यातील माणसांचे जीवन त्यांनी व्यक्त केले. 

हे पण पहा ! मुलांच्या शाही लग्न सोहळ्यात तुफान गर्दी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिवसेनेचे विद्यमान सदस्यांवर गुन्हा दाखल

यावेळी बोलताना डॉ. सुनील चंदनशिवे यांनी दलित साहित्य, परिवर्तनवादी साहित्याची वैशिष्ट्ये विशद करतानाच गावगाड्यातील माणसाचे माणूसपण हरवत असल्याची खंत व्यक्त केली. संविधानिक मूल्ये अंगीकारल्याने माणसाचे माणूसपण अबाधित राहते. हा विचार डॉ. शीला रत्नाकर यांच्या ग्रंथातून व्यक्त होत आहे. मराठी साहित्याच्या प्रांतात या ग्रंथाच्या निमित्ताने नवा आयाम उपलब्ध करून दिला असे ते म्हणाले. 

यावेळी डॉ. प्रशांत गायकवाड यांनी समाज, संस्कृती त्यात अडकलेला गावगाडा विशद केला. धर्मसंस्कृती व कर्मसिद्धांत यात माणूस अडकला असून त्याने विवेकाने विचार करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. 

हे पण वाचा ! पीक विम्यासाठी शेतकरी धडकणार पुण्यातील कृषी आयुक्तालयावर

यावेळी बोलताना मोहन मिणचेकर यांनी गावची व्यवस्था व्यक्त करतानाच त्यातील जातीयतेच्या संदर्भाने नको इतका शिरकाव केल्याची खंत व्यक्त केली. 

या परिसंवादाच्या निमित्ताने डॉ. शीला रत्नाकर यांनी या ग्रंथाच्या निर्मितीबाबत भूमिका व्यक्त केली. या परिसंवादाचे प्रास्ताविक व स्वागत निर्मिती प्रकाशनाचे प्रकाशक अनिल म्हमाने यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील बुचडे यांनी केले. यावेळी डॉ. रामेश्वर कांबळे, आनंद रत्नाकर, प्रा. शोभा चाळके उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय