Monday, May 13, 2024
Homeग्रामीणजुन्नर : बचत गटाच्या महिलांना कामाचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी जुन्नर...

जुन्नर : बचत गटाच्या महिलांना कामाचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील गोरगरीब महिलांना घरबसल्या कामाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या घटना गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा घडल्या आहेत. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्नर तालुक्यातील तांबे या ठिकाणी बचत गटाच्या महिलांना घर बसल्या कडधान्य पॅकिंगचे काम देतो सांगून महिलांना नोंदणी शुल्क भरून नोंदणी करा तुम्हाला घर बसल्या काम मिळवून देतो असे खोटे सांगून नोंदणी शुल्क भरण्यासाठी भाग पाडले. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येऊ पर्यंत बराच उशीर झालेला होता. या फसवणुकी प्रकरणी सुरेखा महेंद्र मडके (तांबे) यांच्या फिर्यादीवरून आरोपी किशोर काळे (पूर्ण नाव माहीत नाही) सह त्याचे दोन मित्र (नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरुद्ध जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सुरेखा मडके यांच्या घरी गेले होते. आमची कडधान्याची पॅकिंग कंपनी आहे. ती कोरोना रोगामुळे बंद पडली आहे आम्ही तुम्हाला घरी कडधान्य आणून देतो. तुम्ही ती पॅकिंग करून द्या. असे सांगून बचत गटाच्या बायकांना बोलावून घेऊन कंपनीचे सभासद म्हणून प्रत्येकी 300 रुपये जमा करा असे सांगून 16 बचतगटातील महिलांनकडून 4800 रुपये घेऊन तेथून निघून गेले. 8 दिवसाने फिर्यादी व इतर बचतगटातील महिलांनी आरोपीत यांना फोन केला असता. कसले पैसे तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणून उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन ठेऊन दिला. यांच्या विरुद्ध जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एस. ताम्हाणे या करत आहेत.

दरम्यान, तालुक्यात अशाच पद्धतीने फसवणूक केल्याची घटना खिरेश्वर तसेच नुकतीच तळेचीवाडी येथे देखील घडली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय