Tuesday, April 30, 2024
Homeजुन्नरजुन्नर बसस्थानक परिसर घाणीच्या विळख्यात, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष... 

जुन्नर बसस्थानक परिसर घाणीच्या विळख्यात, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष… 

जुन्नर / प्रा.सतिश शिंदे : जुन्नर तालुक्यातील दळणवळणाचे मुख्य ठिकाण जुन्नर बस स्थानक हे मागील कित्येक दिवसांपासून अस्वच्छतेच्या साम्राज्यात असलेले पहावयास मिळत आहे. 

जुन्नर बसस्थानकात पुणे, ठाणे, नारायणगाव, मुंबई, औरंगाबाद, अकोले, घोडेगाव, पंढरपूर, बारामती व विविध ठिकाणावरून प्रवासी येत जात असतात. जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असून या ठिकाणी महाराष्ट्रातून असंख्य पर्यटक येत-जात असतात. त्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणच्या घाणीच्या व दुर्गंधीच्या वासामुळे व डासांमुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. तसेच बसस्थानक परिसर धुळीच्या साम्राज्यात पहावयास मिळत आहे, याकडेदेखील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे.

बसस्थानकातील शौचालयांत पाणी नसल्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे, मात्र, या गोष्टीकडे बसस्थानक प्रशासन व स्वच्छता विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे, या ठिकाणच्या परिसरात मोठमोठी झाडे व गवत तसेच सांडपाणी व प्लास्टिक पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. या अवस्थेमुळे बस स्थानकावर बसणारे व येणारे-जाणारे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय