Junnar : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने नारायणगाव येथे आगमनावेळी भाजप नेत्या आशाताई बुचके (Ashatai Buchke) यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून जोरदार विरोध केला. पालकमंत्री अजित पवार आणि आमदार अतुल बेनके यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं केली. या दरम्यान, पोलिस प्रशासन आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला.
आशाताई बुचके (Ashatai Buchke) यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, पक्षाच्या बैठकीच्या नावाखाली तालुक्यातील पर्यटनाची बैठक घेतली जाते. सामान्य जनतेला आंधारात ठेवून परस्पर निर्णय घेतले जात आहेत. राष्ट्रवादी एकच आहे असं सांगितलं आहे असे असेल तर युतीतून बाहेर पडा असे बुचके म्हणाल्या. तसेच हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान आहे या सर्व प्रकरणात प्रशासन शामिल असल्याचा आरोप बुचके यांनी केला.
पुढे बुचके म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, एका आमदारापुरते ते पालकमंत्री नाहीत. शासकीय कार्यक्रम कोणत्याही पद्धतीत अजित दादा हे अशासकीय स्वरूपात घेऊ शकत नाही. त्यांनी बाकीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी विश्वासात न घेता शासकीय कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांचा निषेध बुचके यांनी व्यक्त केला आहे. (Junnar)
हेही वाचा :
लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावेत, हीच या भावाची इच्छा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन
मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका लांबणीवर, वाचा काय आहे कारण !
सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू