जुन्नर / हितेंद्र गांधी : तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागांमध्ये भात, गहू, मध, खुरासणी, रानभाज्या आदींसोबत बाळ हिरडा हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी आदिवासी विकास महामंडळाने हिरडा खरेदीची योजना बंद केली होती. त्यामुळे रोख रक्कम मिळवून देणारा हिरडा स्थानिक व्यापाऱ्यांना दिला जात असून सध्या १३० ते १४५ रुपयांपर्यंत (प्रतिकिलो) बाजारभाव मिळत आहे. हा हिरडा पाऊसाच्या अगोदर झाडावरून काढावा लागत असल्यामुळे हिरडा काढणे, तो वाळवणे आदी कामांची लगबग सुरु आहे.
जुन्नर : घरफोडी व चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश
झाडावरून हिरडा काढणे धोकादायक :
तालुक्यातील कुकडेश्वर, आंबे, हातविज, जळवंडी, घाटघर आदी गावांच्या परिसरात हिरडा आढळतो. ही झाडे उंच असतात तसेच त्यांच्या फांद्या निसरड्या व थोड्या कमकुवत असतात. त्यामुळे हिरडा झोडताना अनेकदा दुर्घटना घडतात.
नुकतेच खडकुंबे येथील एक ग्रामस्थ झाडावरून पडून मृत्युमुखी झाला होता तर भिवाडे येथील एक महिलेला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे रानात वाढणाऱ्या या झाडांवरून हिरडा झोडून काढणे, नंतर वेचने, तो वाळवणे, आदी कष्टाची कामे हे आदिवासी बांधव करत असतात. त्यातच हिरडा काढण्यास उशीर झाला तर त्यात बी तयार होते आणि त्याला खूप कमी बाजारभाव मिळत असतो. त्यामुळे वेळेतच हा माल काढून तो विकणे गरजेचे असते, अशी माहिती कुकडेश्वर येथील संतोष भाऊ दिवटे यांनी दिली.
व्हिडिओ : आंबे येथे शॉर्ट सर्किटमुळे घर जळून खाक
हिरडा भाव आणि महामंडळाकडून खरेदीबाबत आज घोडेगाव प्रकल्प कार्यालयात बैठक
हिरड्याला आयुर्वेदात मोठे महत्व :
सह्याद्रीच्या खोऱ्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, अकोला या तालुक्यांमध्ये हिरड्याची झाडे मोठ्या संख्येने आहेत. येथील राना-जंगलात आढळणाऱ्या हिरड्याचे बाळहिरडा व मोठा हिरडा असे दोन प्रकार असतात. यापैकी बाळ हिरड्याला आयुर्वेदिक औषधांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच रंग बनविण्यासाठीही याचा उपयोग होत असतो.
खोकल्यावर अतिशय गुणकारी असलेल्या हिरड्याचे अनेक फायदे प्राचीन वेदांमध्ये आढळतात. या हिरड्याची प्रतवारी केल्यावर तो दिल्ली, मुंबई, कानपुर तसेच चीन व आखाती देशांमध्ये निर्यात केला जातो, अशी माहिती निर्यातदार मनोज छाजेड यांनी दिली. मात्र लॉकडाऊन व जागतिक मंदी आदी कारणांमुळे सध्या मागणी स्थिर असल्याचे ते म्हणाले.
आपल्या पुण्यात नोकरी शोधताय ? मग आजच अर्ज करा या 8 सरकारी, निमसरकारी नोकरीसाठी !
हिरडा कारखाना उभारण्याचे प्रयत्न गेल्या वीस वर्षांपासून सुरूच
जुन्नर तालुक्यात १९९९ साली कुकडेश्वर आदिवासी हिरडा उत्पादक संघाची स्थापना होऊन हिरडा प्रक्रिया कारखाना उभारणीला सुरुवात झाली. मात्र २३ वर्षानंतरही हा कारखाना अद्याप सुरू झालेला नाही, हे वास्तव आहे. टॅनिन, गॅलिक, ईलॅगिक, पावडर आदी उत्पादने बनविण्याचा उद्देश असलेल्या या कारखान्यासाठी शासनाचा १.३१ कोटी तर नाबार्डचा १.८५ कोटी निधी प्राप्त झाला होता. तसेच सभासदांच्या समभागातुन निधीची उभारणी करण्यात आली होती.
आजमितीस खानापूर (ता. जुन्नर) येथील कारखानास्थळी इमारत, मशिनरी आदी उभारले असून कारखाना सुरू करण्यासाठी खेळते भांडवल, कच्चा माल खरेदी, भरती-पगार आदींसाठी अधिकच्या निधीची आवश्यकता आहे. विविध निवडणुकांमध्ये आदिवासी जनतेला आश्वासन देणारे नेते तसेच स्थानिक आदिवासी नेते हा रेंगाळलेला प्रश्न कधी सोडविणार, याकडे आदिवासी बांधवाचे लक्ष लागले आहे.
नवीन भरती : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज
जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !