पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – मकर संक्रांती नंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या शुभ दिवशी भारताच्या विविध भागांतील लोक वेगवेगळ्या नावांनी संक्रांत साजरी करतात. शेतकऱ्यांचा हा पिके ‘कापणीचा सण’ म्हणून साजरा केला जातो, हा एक हा एक सुगीचा शेतीच्या विपुलतेचा हंगाम असतो. (PCMC)
या तीळ आणि गूळ एकत्र करून त्याची पोळी खाल्ल्यास ती आरोग्यदायी असते. म्हणून
संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात आप्तस्वकीय मित्रमंडळी एकमेकाचे आरोग्य निरामय रहावे यासाठी तिळगुळ, तिळगुळ पोळी एकमेकांना देऊन शेतकरी आणि समाज सुखी रहावा अशी प्रार्थना करतात.अशा भावना तिळगुळ वाटप कार्यक्रमात चिखली येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रोहन चव्हाण यांनी व्यक्त केल्या.



रोहन दादा युवा मंचच्या वतीने एकूण ३० हजार तिळगुळ पाकिटे चिखली,मोशी, कुदळवाडी, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, बोऱ्हाडेवाडी या ठिकाणी मकरसंक्रांती निमित्त वितरीत करण्यात आली.
PCMC
मोशी चिखली येथील सोसायट्या मधील नागरिकांना रोहन चव्हाण यांनी मकरसंक्रांती च्या शुभेच्छा दिल्या.