छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती (PCMC)
सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांची माहिती
पिंपरी-चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपरी-चिंचवड शहरातील सहकारी गृहरचना संस्था (सोसायट्यांचे) सहकुटुंब सहपरिवार महास्नेहसंमेलनाचे आयोजन सोसायटी फेडरेशनमार्फत केले आहे. (PCMC)
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी शहरातील सोसायटीधारकांना एकसंघ करणे, सोसायटीधारकांमध्ये एकात्मतेची भावना रुजवणे आणि ती दृढ करणे, तसेच सोसायट्यांमधील सदस्यांना सहकुटुंब सहपरिवार एकत्र करून आनंद व्यतीत करणे या उद्देशाने शहरातील सोसायटीधारकांचे स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील सोसायटी फेडरेशन कडून त्याचे आयोजन केलेले आहे. (PCMC)
सदर महास्नेहसंमेलनामधून प्रत्येक वर्षी फेडरेशन कडून सोसायटी धारकांसाठी एक विचार मांडला जातो, पिंपरी चिंचवड शहरातील सोसायट्यांसाठी भविष्यांमध्ये घ्यावयाचे निर्णय, तसेच सोसायटी धारकांसाठी राबवायच्या विविध गोष्टी याबद्दल सदर स्नेहसंमेलनामध्ये मार्गदर्शन केले जाते.
पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीधारकांचे विविध प्रश्न, विविध समस्या सोडवण्यासाठी फेडरेशन हे एक मोठे व्यासपीठ तयार झालेले आहे.
शहरातील गृहनिर्माण संस्था चालवत असताना सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियमानुसार त्या कशा चालवाव्यात त्याचप्रमाणे सहकारी गृह निर्माण संस्थांच्या अधिनियमानुसार त्याचे संचलन करण्यासाठी येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी याबाबत सोसायटी फेडरेशन मार्फत कार्य केले जाते. तसेच शहरातील बिल्डर कडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेकडून येणाऱ्या विविध अडचणी समस्या सोडवण्यासाठी फेडरेशन मार्फत पुढाकार घेऊन त्या सोडवल्या जातात.
यावर्षीच्या महास्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, भोसरी विधानसभेचे हॅट्रिक आमदार महेश लांडगे, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पद्मश्री आदरणीय गिरीशजी प्रभुणे तसेच शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे, महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत.
PCMC
सदर स्नेहसंमेलना मधे मुलांच्यासाठी खेळणी तसेच सर्वांच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे. तसेच सर्वांच्यासाठी रुचकर स्नेहभोजन ठेवलेले आहे
प्रतिक्रिया :
मागील दहा वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरातील गृहनिर्माण संस्थेतील सभासदांच्यासाठी आपले फेडरेशन अहोरात्र काम करत आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील सोसायटीधारकांनी आपले ऐक्य दाखवण्यासाठी, आपला फेडरेशनचा ऐक्याचा विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सोसायटीमधील सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार सर्वांना एकत्र घेऊन आनंद उपभोगण्यासाठी हे स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. तरी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सोसायटीमधील सदस्यांनी सहकुटुंब सहपरिवार सदर महा स्नेहसंमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन करीत आहोत.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.
PCMC : चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे ‘‘महासंमेलन’’
- Advertisement -