Tuesday, September 17, 2024
Homeराज्यमोठी बातमी : शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर, सात...

मोठी बातमी : शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर, सात ठिकाणी छापेमारी

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आता ईडीच्या रडारवर आले आहेत. परब यांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांच्यावर ईडीकडून धाड टाकण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या विरोधात ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता अनिल परब यांच्या शिवालय या निवासस्थानी ईडीची एक टीम पोहोचली. परब यांच्या मुंबई, पुणे आणि रत्नागिरी येथील शासकीय तसेच खासगी निवासस्थानी एकूण सात ठिकाणी ईडीची छापेमारी करण्यात आली आहे.

पोलिस बदल्यांच्या प्रकरणात सचिन वाझेंच्या जबानीत अनिल परब यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल परब यांना चौकशीला बोलावले जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय