कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा राधानगरी च्या वतीने आज ठिकपूर्ली ता. राधानगरी या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या जागांवर करणी, भानामती करण्याच्या हेतूने पपई, कापलेली लिंबू, टाचण्या, हळदी कुंकू, बुक्का या सर्वांचा वापर करून गावातील लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि भितीयुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न समाजातील काही लोकांच्याकडून सुरू होता. (Kolhapur)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे गावच्या पोलीस पाटील आणि इतर ग्रामस्थांनी याबद्दलची तक्रार दाखल केली व तात्काळ संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष रेश्मा खाडे व जोडीदाराची विवेकी निवड विभागाचे राज्य कार्यवाह हर्षल जाधव, युवा विभाग प्रमुख राजवैभव, करवीर शाखा कार्याध्यक्ष स्वाती कृष्णात यांनी सदरच्या गावाला भेट देऊन ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी करण्यात येतात त्या ठिकाणी जाऊन लोकांचे प्रबोधन केले. जादूटोणाविरोधी कायद्याविषयी माहिती सांगितली. सोबतच ज्या गोष्टी पाहून लोक घाबरत होते त्या सर्व वस्तू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी एकत्र भरून घेतल्या व लोकांमधील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच यापुढे असा काही प्रकार गावात झाल्यास स्वतः ग्रामस्थ त्या वस्तू उचलून दूर फेकून देतील असा निर्धार देखील केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हिंदुराव दादू चौगले, पोलीस पाटील सीमा अनिकेत कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रणजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य देवकर सर, आनंदा चौगले, सचिन लोकरे, जितेंद्र चौगले, आकाश पाटील, अनिल पाटील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. (Kolhapur)


हे ही वाचा :
मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण
गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ