मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वतीने आयोजित महाराष्ट्र नाताळ भव्यतम सोडतीचा निकाल दि. ३ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालय सभागृहात ही सोडत पार पडली. यामध्ये २५ लाख रुपयांचे पहिले बक्षीस चिराग एन्टरप्रायजेस, नाशिक येथील खरेदीदाराला मिळाल्याचे उपसंचालकांनी कळवले आहे. (Lottery result)
या लॉटरीत एकूण ४९ लाख ४ हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये १० हजार रुपयांच्या आतील ७० बक्षिसे आणि १० हजार रुपयांवरील २,५८२ बक्षिसे समाविष्ट होती.
सर्व खरेदीदारांना आपल्या बक्षिसांची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १० हजार रुपयांवरील बक्षिसांसाठी संबंधित मागणी थेट उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी लागेल. १० हजार रुपयांच्या आतील बक्षिसांसाठी मागणी लॉटरी विक्रेत्यांकडून करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (Lottery result)
ही सोडत जनतेच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी योगदान देणारी ठरावी, अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत.


हे ही वाचा :
नायलॉन मांज्यामुळे नाशिक आणि अकोला मध्ये गळा चिरून दोन जणांचा मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, महायुतीच्या आमदारांना करणार मार्गदर्शन
ग्राहकांसाठी खूशखबर : ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल, 40-70% पर्यंत सूट
महाकुंभ टाईप केल्यानंतर गूगल सर्च पेज वर पुष्पवृष्टी
पुण्यात विद्यार्थ्यांची फ्रीस्टाईल हाणामारी, कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण
‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…
सुंदर स्टेटस ठेवला अन् काही वेळातच भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू
‘सारथी’मार्फत तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण, 10 हजार विद्यावेतन मिळणार