Junnar, (दि. ४) रफिक शेख: जुन्नर तालुक्यातील आमलेवाडी येथे एका अनोळखी म्हातारी महिलेने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी रुक्मिणी दशरथ केदार (वय 40 वर्षे) या महिलेस आपल्या घरासमोर बोलावून आरोपीने फसवणूक करून अंदाजे ₹85,000 रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
फिर्यादीकडून दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने तिचे घराबाहेर बोलावले. आणि आरोपी महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादन करून तिच्याकडे “स्कीम” असल्याचे सांगत सोन्याचे मनी मंगळसूत्र व टॉप्स जोड माझ्याकडे पॉलिशसाठी द्या मी थोड्यावेळात शिलाई मशीन आणि दागिने आणून देते सांगून फसवणूक केली. सदर घटना 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. (Junnar)
चोरी गेलेल्या मालाचे मूल्य अंदाजे ₹85,000 आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 288/2024 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काळे व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस फौजदार भोजने हे प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी