Saturday, May 11, 2024
Homeआरोग्यजुन्नर : "या" ग्रामपंचायतीने सुरु केले कोव्हीड केअर सेंटर

जुन्नर : “या” ग्रामपंचायतीने सुरु केले कोव्हीड केअर सेंटर

जुन्नर (पुणे) : आज आळे येथे ग्रामपंचायत आळे संचलित व विशाल जुन्नर सेवा मंडळ यांच्या सहकार्याने ‘शरदचंद्र आरोग्य मंदिर’ या ‘कोविड केअर सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. 

आळेफाटा, वडगाव आनंद व आसपासच्या गावांमधील नागरिकांची कोरोना उपचारासाठी या सेंटरमुळे सोय होणार आहे. यासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाने आपली शैक्षणिक संस्थेची इमारत उपलब्ध करून दिली, तसेच परिसरातील अनेक दानशूर व्यक्तींनी यासाठी हातभार लावला आहे.

 

यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, आळे गावचे सरपंच प्रितम काळे, विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, नेताजी डोके, धनंजय काळे, उमेश शिंदे, दिलीप वाव्हळ,  ग्रा.प.सदस्य बाजीराव लाड, लता वाव्हळ, सविता भुजबळ, मंगल तितर, समीर टकले, व्यापारी असोसिएशनचे विनोद गांधी हे उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय