मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लॉकडाऊन संदर्भात चर्चा करण्यात आली. राज्यात लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याची परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे सध्याच्या लॉकडाउनच्या शेवटच्या दिवशी याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
सध्या राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. परंतु १ मे नंतर पुढे आणखी १५ दिवसांचा लॉकडाउन वाढवणार असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.